क्रिडाई कोल्हापूर तर्फे ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर،युथ विंग, वुमेन्स विंग तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील एन.टी.सरनाईक नगर, पाचगाव रोड, कोल्हापूर येथील खुल्या जागेच्या सभोवताली खोल चर मारून त्यामध्ये ७ फूट उंचीची वड,पिपंळ,कडुनींब, नारळ,कोनोकरप्स, अशी १२५ रोपे लावावेत आलीत. या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, संग्राम दळवी, सुनिल चिले, अतूल पोवार, मौक्तीक पाटील, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, माजी सचिव संदीप मिरजकर सभासद श्रीधर कुलकर्णी, विजय माणगावकर, सुधीर हंजे, उदय निचिते, योगेश आठल्ये, संदिप बोरचाटे, प्रतिक पाटील, मौसिन मुल्लाणी، मिलिंद नाईक, युथ विंग मयूरेश यादव, पंकज कोकणे, वुमेन्स विंग च्या क्रिडाई कोल्हापूरच्या समन्वयक मोनीका बकरे, सह समन्वयक शिल्पा कुलकर्णी, क्रिडाई महाराष्ट्राच्या सह समन्वयक संगीता माणगांवकर, सपना मिरजकर, खुशबू परमार, अर्चना पोवार, साक्षी बोरचाटे रूपाली बकरे, एन.टी.सरनाईक नगर मंडळाचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र पांडव, बाळासाहेब पाटील, सचिन जाधव व सर्व सदस्य, नागरिक ,डायमंड ग्रुप सर्व सदस्य हजर होते.