दि.२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी ऐतिहासिक पन्हाळगडावर हॉटेल हिल टॉप च्या हॉल मध्ये योगदिन मोठ्या उत्साहात पार पडला.क्रिडाई महाराष्ट्र व क्रिडाई कोल्हापूरचे सभासद या वेळी उपिस्थत होते. एक पृथ्वी,एक आरोग्यासाठी योग हि यंदाच्या योगदिनाची मुख्य संकल्पना होती. सभासदांनी योगासने,सूर्यनमस्कार,योगाचे महत्त्व,प्रकार, योगासनाचे विविध आसने केलीत.