२८ जून २०२५ रोजी क्रिडाई महाराष्ट्राची दुसरी जनरल बॉडी मीटिंग आहिल्यानगर येथे पार पडली. क्रिडाई महाराष्ट्राकडून दिनांक १ ते ७ मे २०२५ या सप्ताहात सर्व सिटीनां Gratitude Week Towards Construction Labour श्रमीक सम्मान -आपक योगदान -हमारा अभिमान बांधकाम कामगार कृतन्यता आठवडा साजरा करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानास क्रिडाई कोल्हापूर ने प्रतिसाद देवून एक चागंला रिपोर्ट करून क्रिडाई महाराष्ट्राला पाठवला होता.क्रिडाई कोल्हापूर ला या सभेमद्ये १०० ते २०० सभासद संख्या असलेल्या सिटी चाप्टरमध्ये सर्वोत्कृष्ट शहरासाठीचा पुरस्कार रनर अप -२ रा अवार्ड मिळाला. हा अवार्ड स्विकारणेसाठी क्रिडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर,क्रिडाई कोल्हापूरच्या लेबर वेल्फेअर कमिटीचे कनव्हेंनर संदिप मिरजकर, संचालक नंदकिशोर पाटील, सुनील चिले,विजय माणगावकर उपस्थित होते.