दि. १५ सप्टेंबर रोजी क्रिडाई कोल्हापूरच्या विद्यमाने व क्रिडाई महाराष्ट्र तसेच दिशा फाउंडेशनच्या सहयोगाने कामगार बांधवांच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत – “प्लंबर प्रशिक्षण शिबिरा” चा शुभारंभ झाला. या प्रशिक्षणामध्ये रणजीत कांबळे व प्रशांत जाधव यांनी कामगार बांधवांना मार्गदर्शन केले.माननीय विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र कार्यक्रमासाठी माननीय उमेश वानखेडे (OB इन्चार्ज, लेबर वेलफेअर व स्किल डेव्हलपमेंट कमिटी) व सपना राठी (कन्व्हेनर, लेबर वेलफेअर व स्किल डेव्हलपमेंट कमिटी) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी मा.प्रकाश देवलापुरकर, उपाध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर;गणेश सावंत सचिव,संदिप मिरजकर, को-कन्व्हेनर (लेबर वेलफेअर स्किल डेव्हलपमेंट कमिटी, महाराष्ट्र) संचालक, सभासद आणि दिशा फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.