सालाबादप्रमाणे यंदाही सर 15 सप्टेंबर हा दिवस सर मोक्षगुडंम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिन अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर तर्फे रक्तदान शिबीर बालाजी गार्डन येथे आज दि. 16/09/2025 रोजी आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरवात क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत,उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, संचालक व महालक्ष्मी ब्लड बँक चे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे, यांच्याहस्ते दिप प्रज्वलनाने झाली. डॉ डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या सुपरिडेंट डॉ. वैशाली गायकवाड मॅडम हजर होत्या.क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी, सभासद, युथ विंग, वुमेन्स विंग सदस्य व क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांचा स्टाप यांनी उस्फुर्त भाग घेऊन रक्तदान केले. यावेळी अध्यक्ष के.पी.खोत यांनी महालक्ष्मी ब्लड सेंटर चे प्रमुख डॉ. विजयकुमार बर्गे यांचेकडे रक्ताच्या 60 बॅग सुपूर्द केल्या