दि. १९ सप्टेंबर २०२५ हिरा श्री लेक सिटी हिरा श्री लेक सिटी – न्यूट्रिशन व मेंटल हेल्थ अंतर्गत उपक्रम हिरा श्री लेक सिटी यांच्या व्यवस्थापन व भारती आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या सहयोगाने बांधकाम क्षेत्रातील कामगार बांधवांसाठी आरोग्य व पोषण समारंभ आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मा.विद्यांनंद बेडेकर (उपाध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र राज्य) त्यांनी कामगार बांधवांना दैनंदिन आहारात कोणते अन्न पदार्थ घ्यावेत,संतुलित आहार,पालेभाज्या, डाळी, दूध यांचा नियमित समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते हे त्यांनी सांगितले. थोडा वेळ काढून योगाभ्यास व श्वसनक्रिया (प्राणायाम) केल्याने मानसिक ताण कमी होऊन आरोग्य निरोगी राहते असेही के. पी. खोत (अध्यक्ष, क्रिडाई कोल्हापूर) त्यांनी चांगल्या सवयी अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले. नियमित झोप, वेळेवर अन्नसेवन,तंबाखू व दारूसारख्या घातक पदार्थांपासून दूर राहणे या गोष्टींचा आरोग्यावर थेट परिणाम होतो हे त्यांनी सांगितले.कामगार बांधवांनी कामासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मान. कृष्णात पाटील त्यांनी बांधकाम साईटवर उपलब्ध असणाऱ्या सुविधा, आरोग्य तपासणी शिबिराचे फायदे व त्या माध्यमातून प्रत्येक कामगाराला आरोग्याविषयी जागरूक होण्याची गरज यावर प्रकाश टाकला.मान. संदीप मिरजकर (को-कन्व्हेनर, क्रिडाई महाराष्ट्र राज्य) कार्यक्रमाची प्रस्तावना करताना त्यांनी या उपक्रमामागील हेतू व बांधकाम क्षेत्रातील कामगारांचे महत्त्व याची जाणीव करून दिली.डॅा प्रेरणा पाटील (मेडिकल ऑफिसर, भारती हॉस्पिटल) त्यांनी आज होणाऱ्या आरोग्य तपासणीबद्दल माहिती दिली व तपासणीमुळे रोगांची लवकर ओळख होऊन योग्य उपचार घेता येतात याचे महत्त्व अधोरेखित केले.मान. उदय निचिते (को-ऑर्डिनेटर, क्रिडाई कोल्हापूर) त्यांनी आभार प्रदर्शन करताना सर्व मान्यवर, आयोजक, डॉक्टर व कामगार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.कामगार बांधवांसाठी पौष्टिक नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.या उपक्रमाचा उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगार बांधवांचे आरोग्य, पोषण व मानसिक स्वास्थ्य जपणे हा होता. या कार्यक्रमास साधारणतः १०० कामगार बांधव आणि भगिनी उपस्तिथ होते.