१ मे कामगार दिनाचे औचित्य साधून क्रिडाई महाराष्ट्र यांचे मार्गदर्शन सुचने नुसार दि.५ ,८,१३ आणि २१ मे २०२६ क्रिडाई कोल्हापूरने आपल्या सभासदांच्या वेगवेगळ्या बांधकाम साईट वरती बांधकाम कामगारांप्रति कृतज्ञता कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये कामगार नोंदणी,त्यानंतर चे लाभ,आरोग्य तपासणी,डोळे तपासणी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,सुरक्षा संच व गृहपयोगी संच यांचे वाटप,असे विविध प्रकारचे उपक्रम घेतले. सेफ्टी इंजिनिअर यांनी बांधकाम कामगारांना साईट वरती काम करत असताना आपली सेफ्टी सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि ती कशी घ्यावी,सेफ्टी किटच्या प्रत्यक्षीकासह सादर केली.असे विविध उपक्रमाचे नियोजनाचे करणेत आले होते.