दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने क्रिडाई कोल्हापूर कार्यालयात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक संचालक मा. प्रशांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, क्रिडाई कोल्हापूर चे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.