29 जानेवारी 2025 रोजी क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयात सुप्रसिद्ध चार्टर्ड अकौटंट (सिए) आणि प्रसिद्ध पुस्तक “रोमान्सिंग द बॅलन्स शीट”चे लेखक श्री अनिल लांबा सर यांना आमंत्रित केले होते.
श्री अनिल लांबा हे आर्थिक साक्षरता कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी वित्त विषयावर शेकडो सेमिनार आयोजित केले आहेत.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अध्यक्ष के पी खोत यांनी सर्वांचे स्वागत केले व लांबा सरांच्या विषयी माहिती दिली.
आज लांबा सरांनी सभासदांना फायनान्स या विषयावर माहिती दिली. बांधकाम व्यावसायामध्ये फायनान्स हा विषय महत्तवाचा का आहे हे सांगीतले.