09 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर स्पोर्टस क्लब आणि रग्गेडियन आयोजित डी वाय पी ग्रुप कोल्हापूर रन मॅरेथॉन सुमारे 4 हजार स्पर्धकांच्या उत्साही सहभागाने 9 वी कोल्हापूर रन स्पर्धा यशस्वी पार पडली. पोलिस कवायत मैदानापासून या मॅरॅथॉनला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहआयुक्य आयकर विभाग अमित खटावकर, उद्योजक सिद्धर्थ बन्सल, डी वाय पी ग्रुपचे व्हाईस चान्सलर राकेश मुदगल, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ ने मॅरेथॉनचा प्रांरभ झाला. या वेळी क्रिडाई कोल्हापूरचे सचिव संदिप मिरजकर, सभासद चेतन चव्हाण, दिलीप जाधव, आशिष तंबाके यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता