17 फेब्रुवारी 2025 रोजी मा नितिनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार हे कोल्हापूर दौ−यात कोल्हापूर विभागातील महामार्गांच्या कामांबाबत बैठक घेतली असता कोल्हापूर विभागातील कागल − सातारा, कोल्हापूर − सांगली, नागपूर − रत्नागिरी महामार्ग, आदी कामांबाबत बैठक घेतली.
बास्केट ब्रिज व महामार्गाचा पिलर ब्रिज मंजुर आहे त्याचे काम लवकर सुरू करून पुर्ण होणेबाबत नॅशनल हायवे व बास्केट ब्रिजच्या कामाच्या प्रगती बाबत आणि कोल्हापूर शहराच्या अंतर्गत ओव्हर ब्रिजला निधी मिळणेबाबत निवेदन देते वेळी खासदार छत्रपती शाहूजी महाराज, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सभासद अभिजीत मगदुम उपस्थित होते