८-१० मार्च २०२५ रोजी दै पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2025 नागाळा पार्क येथील आर व्ही ओपन ग्राऊंडवर कोल्हापूर येथील महत्वाकांक्षी गॄहप्रकल्पांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. तिन दिवस भरलेल्या या प्रर्दशनात हजारो ग्राहकांनी भेट दिली. क्रिडाई कोल्हापूर चे सभासद आणि शहरातील इतर बांधकाम व्यावसायिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
या प्रदर्शनाला उदघाटन श्री प्रकाश आबिटकरआरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर, श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर, श्री विद्यानंद बेडेकर उपाध्यक्ष क्रिडाई महाराष्ट्र, श्री के पी खोत अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर, श्री दिपक कल्याणजी चंदे प्रोप्रायटर सि ई ओ एम डी दिपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री सचिन मांगले संचालक श्री सिध्दी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री पॄथ्वीराज गायकवाड संचालक गायकवाड इंफ्रास्ट्रक्चर, श्री अविनाश जाधव संचालकआविष्कार इंफ्रा कोल्हापूर या सर्वांच्या उपस्थिीतीत पार पडले. या प्रदर्शनात क्रिडाई कोल्हापूरच्या 13 सभासदांनी सहभाग घेतला होता.