09 मार्च 2025 रोजी ‘कोल्हापूर फस्ट’ कोल्हापूरच्या सर्वांगीन विकासाच्या व्हिजनने कटीबद्ध असलेल्या 14 नामांकित संघटनांच्या पुढाकाराने कोल्हापूरच्या शाश्वत विकास साध्य करण्यासाठी कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व अबाधित राखून नेक्स्ट जनरेशनला अपेक्षीत कोल्हापूर बनविण्यासाठी ‘कोल्हापूर फस्ट’ हा कार्यक्रम होटेल पॅव्हेलियन , मधुसूदन हॉल कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आला.
‘कोल्हापूर फस्ट’ ही संकल्पना सत्यात उतरवायची असेल तर सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याची गरज आहे. यासाठी हद्दवाढ व शक्तिपीठ महामार्ग होणे गरजेचे आहे. असे विचार पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेबांनी मांडले.