13 मार्च 2025 रोजी सांय 5 वा क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयात क्रिडाई महाराष्ट्र पेडिलाईट चे वॉटरप्रूफिंग या विषयावरती विशेष सत्र आयोजित केले होते. वॉटरप्रूफिंगची सुरूवात ते आजपर्यंत चा प्रवास अशा विषयावरती विडीओ − ऑडिओ माध्यमातून सादरीकरण केले. पेडिलाईटने आपले उत्पादनाचे नमुने क्रिडाई कोल्हापूरच्या कार्यालयात प्रदर्शित केली होती. या वेळी अध्यक्ष के पी खोत, सचिव संदिप मिरजकर, क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाई महाराष्ट्राचे प्रतिनिधी सुधिर खटावकर, क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी संचालक मंडळ, सभासद मोठया संख्येने उपस्थिीत होते