क्रिडाई कोल्हापूरच्या नवीन मॅनेजिंग कमिटीचा पदग्रहण हाॅटेल सयाजी येथे दि. २८ /०३/२०२५ रोजी पार पडला. नविन मॅनेजिंग कमिटीची बिनविरोध निवड झाली असून, सध्याचे अध्यक्ष श्री.के.पी.खोत यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.या मॅनेजिंग कमिटीचा पदग्रहण समारंभ कार्यक्रम कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक मा.के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर चे जिल्हा पोलीस प्रमुख मा. महेंद्र पंडीत, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष श्री. के.पी.खोत , क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर यांच्या उपस्थितीत हाॅटेल सयाजी येथे दि. २८ /०३/२०२५ रोजी पार पडला. यावेळी मान्यवरांचा क्रिडाई कोल्हापूर च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अध्यक्ष के.पी.खोत यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.क्रिडाई महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर यांची क्रिडाई महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा.महेंद्र पंडीत साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा.के. मंजूलक्ष्मी यांनी श्री.के.पी.खोत यांची सन २०२५-२७ सालाकरीता क्रिडाई कोल्हापूर च्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याची व पदभार स्वीकारण्याची घोषणा करून त्यांना अध्यक्षपदाचे मेडल व पिन प्रदान केले व २०२५-२०२७ साला करीता अध्यक्ष पदाची सुत्रे सुपूर्त केली. सन २०२५-२७ च्या मॅनेजिंग कमिटी मध्ये निवड झालेल्या सदस्यांची घोषणा खालील प्रमाणे अध्यक्ष के.पी.खोत यांनी केली व पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पिन प्रदान करण्यात आली. उपाध्यक्ष,प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव -गणेश सावंत, खजानीस अजय डोईजड, सहसचिव निखिल शहा, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानीस श्रीराम पाटील, सहखजानीस सागर नालंग, खालील प्रमाणे मॅनेजिग सदस्य सचिन ओसवाल, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदिप पवार, अमोल देशपांडे, श्रीकांत पाटील, संग्राम दळवी, अतुल पोवार, सुनील चिले, मौक्तिक पाटील