रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के. पी. खोत व संचालक मंडळ यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांची भेट घेवून क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांच्या विविध प्रशनाबाबत चर्चा केली. मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर बैठक घेण्याविषयी विनंती केली.आपले प्रश्न मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर एक बैठक घेवून त्यामध्ये सर्व विषय मांडण्याचे आश्वासन दिले. वेळी अध्यक्ष के.पी. खोत, सचिव गणेश सावंत, संचालक संदीप पोवार उपस्थित होते.