क्रिडाई महाराष्ट्राची पहिली जनरल बॉडी मिटींग आणि क्रिडाई महाराष्ट्राची नवीन कार्यकारणीचा सन २०२५-२७ चा पदग्रहण समारंभ जेडब्ल्यू मॅरियट सेनापती बापट रोड,पुणे. येथे सोमवार दि. २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५. वाजता पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे आदरणीय श्री.अजितदादा पवार मा. उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,वित्त व नियोजन आणि उत्पादन शुल्क मंत्री,तथा पालकमंत्री पुणे. नूतन क्रिडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष मा. प्रफुल्ल तावरे व सर्व संचालक मंडळ,विविध कमिट्याचे प्रमुखांचा सत्कार करणेत आला.मा .अजितदादा पवार साहेबांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा देवून क्रिडाई च्या कामाबद्दल अभिनंदन केले. क्रिडाई महाराष्ट्राच्या कमिटीवर क्रिडाई कोल्हापूरचे विद्यानंद बेडेकर यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली तसेच क्रिडाई कोल्हापूरच्या इतर सभासदांचाही विविध कमिट्यावर निवड झाल्याने त्यांचे सत्कार करणेत आलेत.