दि ३० एप्रिल २०२५ रोजी मा.आमदार अमल महाडीक साहेब क्रिडाई कोल्हापूर कार्यालयास भेट दिली. या वेळी अध्यक्ष के.पी. खोत यांनी साहेबाचे स्वागत करून कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत प्रश्न व शासन स्तरावरील काही प्रश्न साहेबांच्या समोर मांडले. यास उत्तर देताना मा आमदार साहेबांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अडचणी, या त्या त्या संबंधित विभाग आणि अधिकारी, व आयुक्त,उप आयुक्त, नगररचना विभाग यांच्या बरोबर एक संयुक्तत बैठक आयोजित करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या वेळी अध्यक्ष के.पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर चेतन वसा,सचिव गणेश सावंत क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, तसेच जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते