१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूरने आपल्या बांधकाम कामगार बंधू-भगिनींसाठी कृतज्ञता सोहळा राबणाऱ्या हातांवर मायेची फुंकर बांधकाम कामगारांची बीओसीडब्लु खाली नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. आणि सर्व कामगार बंधू भगिनींसाठी संदिप मिरजकर यांच्या हरिप्रिया संकुल, श्री. सिद्धी विनायक असोसिएट्स -एमीनेन्ट स्क्वेअर, केदार डेव्हलपर्स -केदार पार्क,आणि देशपांडे इन्फ्रा-पार्कसाईड यांच्या साईट वरती कार्यक्रम घेणेत आलेत या वेळी साईट वरती बांधकाम कामगारांची बीओसीडब्लु खाली नोंदणी,नोंदणी अद्यावत करणे,आरोग्य तपासणी शिबीर यामध्ये रक्त,डोळे तपासणी आणि आरोग्याच्या विविध तपासणी,करून घेतल्या आणि त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. इमारत कामगार मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना त्यांचे लाभ कसे मिळतात याची सविस्तर माहिती दिली.या चारही दिवसात कामगारांची नोंदणी अभियान,सुरक्षा खबरदारी आणि त्याचे प्रशिक्षण,सुरक्षा किटचे वितरण,आरोग्य तपासणी शिबीर, कौशल्य विकास,कामगार कल्याण योजनाची माहिती,विविध अभ्यासपर चर्च सत्र असा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमाला क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रिडाई कोल्हापूर चे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत,व संचालक मंडळातील पदाधिकारी हजर होते.