मा. रणजित नाईकनवरे उपाध्यक्ष, क्रिडाई नॅशनल यांनी दि 8 मे 2025 रोजी क्रिडाई कोल्हापूरच्याकार्यालयात संचालक मंडळाची भेट घेतली. कोल्हापूर,पुणे,मुंबई,आणि गोवा येथे माध्यम मोठे गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रोजेक्ट उभारले आहेत.आम्ही मार्केट मध्ये काय मागणी आहे याचा विचार करूनच प्रोजेक्ट उभारतो.मुबंई,पुणे या शहराबरोबरच लहान शहरातपण आधुनिक सुविधा,उत्कृष्ट बांधकाम,योग्य दर,द्यावा लागतो.विविध ऑफर्स ने ग्राहकांना आकर्षित करावे लागते.आमच्या कंपनीने विक्री,बांधकाम,आर्किटेक्चर,डिझायनींग आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवामंध्ये इन-हाऊस सुविधा विकसित केली आहे. नाईकनवरे डेव्हलपर्स हे कुटुंब या ब्रँड नावाने जेष्ठ नागरिक/आंतरपिढीतील रेसिडेंसिअल
प्रोजेक्ट उभारत आहे.सभासदांनी विचारलेल्या प्रश्न आणि शंका यांची समर्पक उत्तरे नाईकनवरे साहेबांनी दिलीत.