१ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून क्रिडाई कोल्हापूरने आपल्या बांधकाम कामगार बंधू-भगिनींसाठी कृतज्ञता सोहळा राबणाऱ्या हातांवर मायेची फुंकर बांधकाम कामगारांची बीओसीडब्लु खाली नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. आणि सर्व कामगार बंधू भगिनींसाठी संदिप मिरजकर यांच्या हरिप्रिया संकुल, श्री. सिद्धी विनायक असोसिएट्स -एमीनेन्ट स्क्वेअर, केदार डेव्हलपर्स -केदार पार्क,आणि देशपांडे इन्फ्रा-पार्कसाईड यांच्या साईट वरती कार्यक्रम घेणेत आलेत या वेळी साईट वरती बांधकाम कामगारांची बीओसीडब्लु खाली नोंदणी,नोंदणी अद्यावत करणे,आरोग्य तपासणी शिबीर यामध्ये रक्त,डोळे आणि आरोग्याच्या विविध तपासणी,करून घेतल्या आणि त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. इमारत कामगार मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना त्यांचे लाभ कसे मिळतात याची सविस्तर माहिती दिली. नूतन नोंदणी केलेल्या कामगारांना क्रिडाई कोल्हापूर तर्फे भेट वस्तू वाटप करण्यात आल्या तसेच नोंदणी कामगारांना गृहपयोगी संच वाटप केले . या चारही दिवसात कामगारांची नोंदणी अभियान,सुरक्षा खबरदारी आणि त्याचे प्रशिक्षण,सुरक्षा किटचे वितरण,आरोग्य तपासणी शिबीर, कौशल्य विकास,कामगार कल्याण योजनाची माहिती,विविध अभ्यासपर चर्च सत्र असा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमाला मा.विशाल घोडके,सहाय्यक आयुक्त,इमारत बांधकाम कामगार विभाग,कोल्हापूर आणि मा.विद्यानंद बेडेकर उपाध्यक्ष क्रिडाई महाराष्ट्र, यांच्या शुभ हस्ते व क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मा.विशाल घोडके साहेबानी सर्व कामगारांना आजच्या कामगार दिनाच्या शुभेच्या दिल्या.साहेबांनी कामगारांना इमारत कामगार मंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना त्यांचे लाभ कसे मिळतात याची सविस्तर माहिती दिली. तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ठ/सर्वोत्कृष्ट कारागीर/कामगार पुरस्कार देण्याबद्दल सूचना करण्यात आली व ती सुचना क्रीडाई कोल्हापूर/ क्रीडाई महाराष्ट्र यांनी विचाराधीन घेत असल्याचे सांगितले. तसेच क्रिडाई कोल्हापूर नेहमीच सामाजिक उपक्रमात भाग घेत असून,सलग पाच वर्षे हा कार्यक्रम घेत आहे.या पैकी तिन कार्यक्रमास मी उपस्थित आहे असे सांगितले. अध्यक्ष के.पी.खोत यांनी आपल्याभाषणात कामगारांना आम्ही इतक्या उंच इमारती उभा करत असतो.आपण सर्व जण आमचे विविध बांधकाम साईटवर अहोरात्र काम करत असता. आमची जबाबदारी आहे कि आपल्या सर्वांची नोंदणी करणे, नूतनीकरण करणे, विविध योजनांचा लाभ मिळवून देणे. या साठी लागणारे विविध कागदपत्र, ९० दिवसांचा बांधकाम कामगार दाखला आणि इतर कागदपत्र आमच्या कार्यालयामध्ये जमा करावीत आम्ही त्याचा पाठपुरावा करून लाभ मिळवून देवू अशी ग्वाही दिली. विद्यानंद बेडेकर उपाध्यक्ष क्रिडाई महाराष्ट्र, यांनी आजच्या या कार्यक्रमात आम्ही क्रिडाई महाराष्ट्र कडून १ ते ७ मे या आठवड्याच्या कार्यक्रमात विविध उपक्रमाने कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानां प्रथम बांधकाम कामगारांची नोंदणी अभियान,सुरक्षा खबरदारी आणि त्याचे प्रशिक्षण,सुरक्षा किटचे वितरण,आरोग्य तपासणी शिबीर, कौशल्य विकास,कामगार कल्याण योजना,विविध अभ्यासपर चर्च सत्र असा कार्यक्रम आखला आहे. याची अमंलबजावणी क्रिडाईच्या सभासदांनी करावी असे आव्हन त्यांनी केले. संदिप मिरजकर यांनी आजच्या या कार्यक्रमात आरोग्याच्या विविध तपासणी या मोफत करणार असून त्याचे रिपोर्ट देण्यात येणार आहेत. कामगारांना स्नेहभोजन आयोजन केले होते. दिशा फाऊंडेशन यांनी बाधंकामगाराची नोंदणी,पुनः नोंदणी करून घेतली तर लोटस मेडिकल फाऊंडेशन आरोग्य तपासणी करून घेतली ओम हॉस्पिटल यांनी नेत्र तपासणी केली. अल्ट्राटेक सिमेंटचे वितरक श्रेयस ट्रेडर्स चे मालक रवी नंदीकर यांनी सर्व कामगार बंधूना मिठाई व कॅप सर्वांना दिल्या या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूर पदाधिकारी संचालक मंडळ सभासद ,युथ विंग,वुमन विंग, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमास कामगार आयुक्त विशाल घोडके, क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रिडाई कोल्हापूर चे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल, संदिप पोवार,सुनिल चिले, क्रिडाई कोल्हापूर चे सभासद, युथ विंग चे सह समन्वयक प्रतिक होसमनी व सदस्य, वुमेन्स विंग च्या समन्वयक मोनीका बकरे सदस्य, दिशा फौंडेशनचे अमित गायकवाड व स्टाफ, लोटस हॉस्पिटल स्टाफ, ओम् हॉस्पिटल चा स्टाफ, बांधकाम कामगार, हजर होते.एकंदरीत सदरचा कार्यक्रम अतिशय छान झाला सर्वांचे आभार क्रिडाईचे सिचव गणेश सावंत यांनी मानले.