दि. ४ मे २०२५ रोजी क्रिड़ाई कोल्हापुर ने सभासद अंतर्गत कळंबा टर्फ sports Castle, येथे क्रिकेट लिगचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आठ संघ आणि प्रत्येक संघात आठ खेळाडू,प्रत्येक टिम चा एक आयकॉन खेळाडू होते. साखळी फेरीतील सर्व सामने अटीतटीचे झाले.प्रत्येक संघाने २ सामने खेळले आणि अंतिम सामना साय. ७ वा. अनंत ड्रीम चेसर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळविण्यात आला. हा सामना अतिशय रोमहर्षक झाला.अंतिम सामना अनंत ड्रीम चेसर्स यांनी जिंकला.बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या आतषबाजीत पार पडला.सर्व सामन्यातील सामनावीर,तसेच उत्कृष्ट फलंदाज सचिन परांजपे,उत्कृष्ट गोलंदाज श्रीराम पाटील, मालिकावीर सचिन परांजपे,व विजेत्या संघ अनंत ड्रीम चेसर्स आणि उपविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स यांना ट्रॉफि देवून गौरविण्यात आले.हि स्पर्धा यशस्वी पार पाडणेत टीमचे मालक,भाग घेणारे खेळाडू, सभासद,क्रिकेट कमिटी सदस्य,संचालक मंडळ,व प्रायोजक लाभले सचिव गणेश सावंत आभार मानले.